एप्रिल-जून २०२६ मध्ये प्रकाशित 'नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणच्या (Periodic Labor Force Survey - PLFS)' त्रैमासिक अहवालानुसार बेरोजगारीचा दर ५.४% इतका नमूद करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे
- सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MoS&PI) अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (National Statistics Office - NSO) 'नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणचे (Periodic Labour Force Survey - PLFS)' एप्रिल-जून २०२६ या कालावधीसाचा त्रैमासिक अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
- एप्रिल-जून २०२६ या तिमाहीत १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी बेरोजगारीचा दर (Unemployment Rate - UR) ५.४% इतका नोंदवला गेला आहे. या दरामध्ये मागील तिमाहीच्या तुलनेत ०.४% ची वाढ झाली आहे.
श्रमशक्ती सहभाग दर (Labor Force Participation Rate - LFPR ) बाबतची प्रमुख निरीक्षणे:
एप्रिल-जून २०२६ या तिमाहीत १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी:
- श्रमशक्ती सहभाग दर (LFPR): एकूण LFPR ५४.६% इतका होता, तर मागील तिमाहीत तो ५५.५% इतका होता.
- ग्रामीण LFPR: ग्रामीण LFPR ५६.९% इतका नोंदवला गेला, जो मागील तिमाहीत ५८.२% होता.
- शहरी LFPR: शहरी LFPR ५०.२% इतकाच राहिला असून त्यात कोणताही बदल झालेला नाही.